For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणवर ‘एआय’च्या माध्यमातून वार

06:22 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणवर ‘एआय’च्या माध्यमातून वार
Advertisement

अमेरिका-इस्रायलकडून क्लाउडेचा वापर

Advertisement

अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्यूरीमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला  अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. या अचूक हल्ल्यात अॅँथ्रोपिकच्या क्लाउडे एआयने मदत केली आहे. क्लाउडेचा वापर थेट शस्त्र चालविणे किंवा स्वयंचलित हल्ले करण्यासाठी झाला नाही, परंतु ऑपरेशनची तयारी, रणनीति आणि विश्लेषणात याची मोठी भूमिका राहिली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या या अचूक हल्ल्यात क्लाउडे एआयने 4 पॉइंटवर खास मदत केली आहे.

क्लाउडे इतके महत्त्वपूर्ण का?

Advertisement

क्लाउडे पूर्वीपासूनच अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या क्लासिफाइड नेटवर्क्समध्ये इंटीग्रेटेड होते. म्हणजेच हे केवळ बाहेरील टूल नव्हते, तर सैन्यव्यवस्थेचा हिस्सा ठरले होते. इंटेलिजेन्स प्रोसेसिंग, प्लॅनिंग आणि विश्लेषणात याची रीजनिंग क्षमता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

अँथ्रोपिकच्या क्लाउडे एआयचे योगदान

1 रियल टाइम इंटेलिजेन्स

इराणमध्ये कोणत्या ठिकाणी हल्ले करायचे आहेत, कुठल्या क्षेपणास्त्र तळावर काय घडतेय, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरचे कमांडर कुठल्या ठिकाणी आहेत  याचा डाटा अमेरिकेच्या सैन्याकडे होता. अशाच प्रकारचे हजारो पानांचे दस्तऐवज, उपग्रहीय छायाचित्रे आणि गुप्तचर इनपूटला जलदपणे वाचून त्यांचे विश्लेषण करण्यात क्लाउडे एआयचा वापर करण्यात आला. उपग्रहीय छायाचित्रात खामेनेई यांच्या कार्यालयानजीक असामान्य हालचाली दिसून आल्यावर क्लाउडने त्या छायाचित्राला जुने रिकॉर्ड, गुप्तचर अहवाल आणि मागील पॅटर्नशी जुळवून पाहत ही सामान्य घडामोड होती का सैन्य तयारी हे सांगितले आहे.

2 टार्गेटची ओळख पटविली

अनेक संभाव्य लक्ष्यांपैकी कुणाला पहिले टार्गेट केले जावे हे आव्हान अमेरिकेच्या सैन्यासमोर होते. सर्वोच्च नेते खामेनेई यांचे कार्यालय आणि निवासस्थान, आण्विक केंद्रे, क्षेपणास्त्र तळ, नियंत्रण कक्ष, सैन्य गोदाम या प्रत्येक ठिकाणाचे वेगळे रणनीतिक महत्त्व होते. क्लाउडेने या संभाव्य लक्ष्यांचे मूल्य आणि जोखिमीचे आकलन करण्यास मदत केली. एआयने टार्गेट्सना रँक देणे, क्रॉस व्हेरिफिकेशन करणे आणि सामान्य लोकांना होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेक डाटा पॉइंट्सना जोडून सूचना केल्या, यामुळे अमेरिकेच्या कमांडर्सना जलदत आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत झाली.

3 युद्धाचा सराव

ऑपरेशन एपिक फ्यूरीचा सर्वात मोठा हिस्सा ‘असे घडले तर काय होईल’ याचा अंदाज बांधणे होता. इराण बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs, ड्रोन स्वार्म किंवा प्रॉक्सी ग्रूप्सद्वारे हल्ला करू शकतो याची कल्पना अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या टीमला होती. क्लाउडेचा वापर या संभाव्य स्थितींचे सिम्युलेशन चालविण्यास करण्यात आला. एआयने 100 हून अधिक संभाव्य युद्धस्थितींवर काम केले. उदाहरणार्थ इराणने 500 हून अधिक क्षेपणास्त्रs इराणच्या दिशेने डागली तर सुरक्षा यंत्रणा कशाप्रकारे प्रतिक्रिया देणार याचा सराव करण्यात आला. अमेरिकेच्या तळावर ड्रोन हल्ले वाढले तर कोणती सुरक्षा रणनीति सर्वात उपयुक्त ठरेल हे अभ्यासिले गेले.

4 पोस्ट स्ट्राइक अॅनालिसिस

हल्ल्यानंतरही क्लाउडेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. स्ट्राइकनंतर त्वरित उपग्रहीय छायाचित्रे, ड्रोन फुटेज आणि गुप्तचर अहवाल कमांड सेंटर्सपर्यंत पोहोचविण्यात आले. क्लाउडेने हल्ल्यापूर्वीच्या आणि नंतरच्या छायाचित्रांची तुलना करत पुन्हा कारवाईची गरज आहे की नाही याचे आकलन करण्यास मदत केली. एआयने संभाव्य सेकंडरी डॅमेजचेही विश्लेषण केले. एआयने इराणच्या सैन्य हालचाली आणि त्याच्या कम्युनिकेशन सिग्नल्सचाही अनुमान लावला आहे.

Advertisement
Tags :

.