For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : माजगाव शेतकऱ्यावर हल्ला; वनविभागाची तातडीची कारवाई

05:25 PM Dec 04, 2025 IST | NEETA POTDAR
satara news   माजगाव शेतकऱ्यावर हल्ला  वनविभागाची तातडीची कारवाई
Advertisement

                      जखमी शेतकऱ्याला शासकीय मदत मिळणार

Advertisement

चाफळ : माजगाव (ता. पाटण) येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकऱ्यारी जखमी झाल्याची आणि बिबट्याने दहा कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेतली असून, दौलतनगर येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेत निर्देश दिले आहेत.

बैठकीत मंत्री देसाई यांनीवनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. माजगाव परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्यात यावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी भागात वनविभागाची गस्त वाढवावी. जखमी शेतकऱ्याला शासकीय नियमानुसार त्वरित मदत मिळावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.