For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3 वर्षीय पॅलेस्टिनी मुलीवर अमेरिकेत हल्ला

06:44 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
3 वर्षीय पॅलेस्टिनी मुलीवर अमेरिकेत हल्ला
Advertisement

आरोपी महिलेने जीव घेण्याचा केला प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ ह्युस्टन

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका महिलेने 3 वर्षीय पॅलेस्टिनी-अमेरिकन मुलीच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. घटनेपूर्वी पीडित मुलीच्या आईने हिजाब परिधान केला होता. तर तिची मुलं स्वीमिंग पूलमध्ये पोहत असताना 42 वर्षीय एलिझाबेथ वुल्फ या महिलेने वाद घालण्यास सुरुवात केली. एलिझाबेथने पॅलेस्टिनी महिलेच्या 3 वर्षीय मुलीला स्वीमिंग पूलमध्ये बुडविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एलिझाबेथने पॅलेस्टिनी महिलेचा हिजाब उतरविला आणि तिला मारहाणही केली. पॅलेस्टिनी महिला स्वत:च्या मुलीला वाचविण्यास यशस्वी ठरली.

Advertisement

तर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एलिझाबेथला अटक केली आहे. मी एक अमेरिकन नागरिक असून मी कुठे सुरक्षित राहू शकते हे माहित नाही. माझा स्वत:चा देश पॅलेस्टाइनमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेत आम्हाला सातत्याने द्वेषाला सामोरे जावे लागत असल्याचे पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पॅलेस्टिनी महिलेच्या मुलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे धक्का बसला. कुठल्याही मुलांच्या विरोधात हिंसा होऊ नये. मी या अवघड समयी पीडित कुटुंबाच्या सोबत असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.