Kolhapur Crime | गांधीनगर येथे एडक्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी
गडमुडशिंगी येथील युवकावर जीवघेणा वार; पोलिसांत गुन्हा
उचगाव -गांधीनगर येथे पूर्ववैमनस्यातून एडक्याने हल्ला करून अर्जुन नागेश शिरवाटे (वय २६, रा. बागडी वसाहत, गडमुडशिंगी) याला जखमी केल्याप्रकरणी सुशिल वामुगडे (रा. कदमवाडी, कोल्हापूर), पंकज बासवाणी (रा. गांधीनगर) आणि सुशिल दामुगडे याच्या २ ते ३ मित्रांविरुध्द गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अर्जुन शिरबाटे याने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी पंकज वासवाणी याने गांधीनगर येथील त्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये अर्जुन शिरबाटे आणि त्याच्या मित्रास बोलावून घेऊन मारहाण केली होती. त्या कारणावरून २३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुशिल दामुगडे याने अर्जुन याच्या मित्रास फोनवरून शिवीगाळ करून धमकी 315 दिली. याबाबतची फिर्याद देऊन अर्जुन हा घरी जात असताना पहाटे सब्बा पाचव्या सुमारास पंकज याच्या सांगण्यावरून सुशिल दामुगडे आणि त्याच्या मित्रांनी अर्जुन याचा पाठलाग केला.
त्यांनी मोटारसायकलीवर जबरदस्तीने बसवून त्याला कोल्हापूर येथील सासणे ग्राऊंडजवळील कनाननगर वर्वेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. अर्जुनवर एडक्याने र, हल्ला करून त्याला जखमी केले. सुशिलच्या मित्राने अर्जुनच्या डोक्यात, पायावर लोखंडी पाईपने मारहाण केली. यानंतर सुशिलने अर्जुनला घरी नेऊन अर्जुनचा मित्र विष्णू वैष्णाय याने दिलेली फिर्याद मागे घे, नाहीतर तुला ठार मारणार अशी धमकी दिली. याबाबत रात्री उशिरा गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली.