For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Atpadi Accident News: झरे येथे चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

12:19 PM Jun 13, 2026 IST | NEETA POTDAR
atpadi accident news  झरे येथे चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
Advertisement

चालकावर गुन्हा दाखल 

Advertisement

आटपाडी : रस्त्याकडेला असणाऱ्या गोठ्याजवळ बसलेल्या व्यक्तीला भरधाव महिंद्रा एक्स यु व्ही ५०० ने जोराची धडक दिल्याने झरे (माळबेवस्ती) येथील एकाचा मृत्यू झाला.

बिरुदेव मारुती माळवे (३९) असे मयतचे नाव असून या अपघात प्रकरणी वाहनचालक सुनील दिनकर थोरात (रा. गुळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आटपाडी तालुक्यातील झरे माळवे वस्ती येथील सचिन मारुती माळवे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Advertisement

बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सचिन यांचे बंधू बिरुदेव हे बैलाला वैरण घालून डांबरी रस्त्याच्या कडेला असलेल्या गोठ्याजवळ बसले होते. त्यावेळी झरे ते विभूतवाडी या रस्त्याने झरे गावाकडून एक सिल्वर रंगाची महिंद्रा एक्स यु व्ही ५०० ही गाडी भरधाव आली. तिने बिरुदेव माळवे यास जोराची धडक दिली यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement
Tags :

.