इटलीच्या सिनेरला एटीपीचा करंडक
वृत्तसंस्था / ट्यूरीन
इटलीचा टेनिसपटू जेनिक सिनेरने 2024 च्या टेनिस हंगामाअखेर एटीपी मानांकनात आपले अग्रस्थान कायम राखल्याने येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेवेळी सिनेरचा करंडक देवून गौरविण्यात आला.
सिनेरने 2024 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एक महिन्यापूर्वी सिनेरने एटीपी मानांकनातील आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले होते. एटीपीच्या मानांकनात वर्षअखेरीस अग्रस्थान मिळविणारा इटलीचा सिनेर हा 29 वा टेनिसपटू आहे. येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत सिनेरचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रिजबरोबर होत आहे. चालु वर्षाच्या टेनिस हंगामामध्ये सिनेरची दोनवेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये तो दोषी आढळला होता. त्यानंतर त्याने गेल्या सप्टेंबरमध्ये विश्व उत्तेजक विरोधी एजन्सीने त्याला या प्रकरणातून निर्दोष ठरविले आहे. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षीच्या प्रारंभी होणार आहे.