सिंधुदुर्ग मजूर फेडरेशनच्या संचालकपदी आत्माराम ओटवणेकर बिनविरोध
डिगस-
सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थां संघ मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेच्या संचालक मंडळातील अनुसुचित जाती(SC)/असुसुचित जमाती (ST) या गटातील नैमित्तीकपणे रिक्त झालेले पद भरण्यासाठी सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. त्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार सदर रिक्त झालेल्या पदासाठी श्री. आत्माराम सोमा ओटवणेकर यांचे एकच नामनिर्देशन पत्र आल्याने सदरच्या रिक्त झालेल्या पदावर ते बिनविरोध निवडून आले. त्याबद्दल त्यांचे संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल देसाई तसेच सर्व संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. यापुर्वी ते संघाच्या संचालक मंडळावर 15 वर्षे संचालक म्हणून होते. तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून 20 वर्षे आहेत. सहकारात काम केल्याचा त्यांना चांगला अनुभव असल्याने त्यांच्या ज्ञानाचा संस्थेला निश्चितच उपयोग होणार आहे. सहकारातील जाणकार व्यक्तीची संघाच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मजूर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सहकारातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. हि निवड प्रक्रिया सभेचे अध्यासी अधिकारी श्री. सुनिल पां. मरभळ, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कुडाळ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संघाचे अध्यक्ष-श्री. विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष- श्री. आत्माराम बालम, संचालक- श्री. लक्ष्मण आंगणे, श्री. संदीप सावंत, श्री. श्रीकांत राणे, श्री. संतोष परब, श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, श्री. अनिल कोरगांवकर, श्री. जयेश धुमाळे, सौ. मेघा जिकमडे, सौ. प्रणाली मसुरकर तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक- श्री. श्रीकृष्ण मयेकर उपस्थित होते.