For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांसाठी आतिशी यांनी रिकामी ठेवली खुर्ची

06:14 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांसाठी आतिशी यांनी रिकामी ठेवली खुर्ची
Advertisement

घटनेचा अपमान असल्याचा भाजपकडून आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी दिल्ली सचिवालयात पदभार सांभाळला आहे. याचबरोबर त्यांनी अरविंद केजरीवालांसाठी मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीनजीक स्वत:साठी वेगळी खुर्ची ठेवून घेतली आहे. तर भाजपने याला मुख्यमंत्रिपदाचा अपमान ठरविले आहे. हा घटनेचा अपमान असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला आहे.

Advertisement

संबंधित खुर्चीवर केवळ केजरीवालच बसतील. केजरीवाल पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील आणि तेच या खुर्चीवर बसतील असे आतिशी यांनी म्हटले आहे. भगवान राम वनवासाला निघून गेल्यावर भरत यांच्या मनात जी व्यथा होती, तीच माझ्या मनात आहे. त्यांनी भगवान रामाच्या पादुका ठेवून राज्य चालविले होते. भगवान राम आम्हा सर्वांचे आदर्श आहेत. अरविंद केजरीवालांनी भगवान रामाने दाखवून दिलेल्या मार्गावर  चालत दिल्लीवासीयांची सेवा केली अणि मर्यादांचे पाल करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत केजरीवाल हे विजयी होतील आणि प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करतील असा मला विश्वास आहे. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची ही खुर्ची केजरीवालांची प्रतीक्षा करणार असल्याचे उद्गार आतिशी यांनी काढले आहेत.

हा प्रकार राज्यघटना आणि मुख्यमंत्रिपदाचा अपमान आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या टेबलसमोर दोन खूर्च्या ठेवणे गैर आहे. आतिशी यांनी स्वत:च्या या कृत्याद्वारे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेसोबत दिल्लीच्या जनतेच्या भावनांना ठेच पोहोचविली आहे. अशाप्रकारच्या रिमोट कंट्रोलद्वारे केजरीवाल दिल्ली सरकार चालवू पाहत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष सचदेव यांनी केला आहे.

आतिशी यांनी पद सांभाळताच राजकीय ड्रामा सुरू केला आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारचे लक्ष दिल्लीवासीयांच्या समस्या दूर करण्याऐवजी घटनेचा अपमान करण्यावर आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या शेजारी केजरीवालांसाठी रिकामी खुर्ची ठेवली असून हा प्रकार हास्यास्पद आहे. केजरीवाल यांना पद सोडल्यावर असुरक्षितपणा वाटत असल्यानेच त्यांनी आतिशी यांना हे करण्यास भाग पाडले असावे अशी टीका दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.