For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये क्रीडापटूंना मिळणार प्रोत्साहन : श्रेयसी सिंह

06:46 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये क्रीडापटूंना मिळणार प्रोत्साहन   श्रेयसी सिंह
Advertisement

राज्य सरकारकडून प्रयत्नांना वेग

Advertisement

वृत्तसंस्था/ जमुई

बिहारमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविधप्रकारे प्रयत्न करत आहे. बिहार सरकार क्रीडापटूंना चांगल्या सुविधा आणि संधी देण्यासाठी  योजना लागू करत आहे. नव्या आणि उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी लवकरच एक स्पॉन्सरशिप पोर्टल सुरु करण्यात येणार असून त्या माध्यमातून क्रीडापटूंना आर्थिक सहाय्य उपलब्ध करविण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या क्रीडा अन् माहिती-तंत्रज्ञान मंत्री श्रेयसी सिंह यांनी रविवारी सांगितले आहे.

Advertisement

योजनेच्या अंतर्गत एका स्तरावर तीन लाख रुपये आणि दुसऱ्या स्तरावर 5 लाख रुपयांपर्यंतचे सहाय्य दिले जाणार आहे. पदक आणा, नोकरी मिळवा यासारख्या योजनांमुळे क्रीडापटूंचे मनोबल वाढत असून क्रीडाक्षेत्र आता कारकीर्द आणि रोजगाराचे मजबूत साधनही ठरत आहे. राज्यात खेळांसाठी मूलभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. शूटिंगसाठी जमुई, वॉटर स्पोर्ट्ससाठी बांकासमवेत अन्य जिल्ह्यांची निवड केली जात अहे.  याचबरोबर जलतरण आणि अन्य क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने काम केले जात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.