For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅथलिट स्वप्ना बर्मनचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

06:24 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अॅथलिट स्वप्ना बर्मनचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणारी हेप्टाथलॉन अॅथलिट स्वप्ना बर्मन हिने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेस मुख्यालयात राज्याचे मंत्री ब्रात्य बासू आणि चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत स्वप्ना हिने पक्षाचा झेंडा हाती घेतला. यावेळी सिलिगुडीचे महापौर गौतम देव देखील उपस्थित होते.

स्वप्ना हिने 2018 च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथलॉन प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते. तर 2017 आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही हेप्टाथलॉन प्रकारात पहिले स्थान मिळविले होते. स्वप्ना ही उत्तर बंगालच्या राजबोंगशी या प्रभावशाली समुदायाशी संबंधित आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने तिचा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धोरणांनी प्रेरित होत तृणमूलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले आहे.

Advertisement

उत्तर बंगालमधील राजबोंगशी समुदायाला स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस आणि भाजप दोघांकडून सुरू आहे. या समुदायाची लोकसंख्या 33 लाखाहून अधिक असून कूचबिहार, जलपाईगुडी, दार्जिलिंग, मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांमध्ये लक्षणीय प्रमाण आहे.

Advertisement
Tags :

.