अतिथी तुम कब जाओगे'च्या दिग्दर्शकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू
मुंबई
अतिथी तुम कब जाओगे, सन ऑफ सरदार, वन टू थ्री, गेस्ट इन लंडन या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन धर यांच्या मुलाचा मुंबईत विले-पार्ले नजीक अपघाती मृत्यू झाला. दिग्दर्शक अश्विन धर यांचा मुलगा जलज धर (वय १८) हा आपल्या तीन मित्रांसमवेत पहाटे ड्रायव्हिंगसाठी गेला होता. या अपघातात जलजसह त्याच्या अजून एका मित्राचाही मृत्यू झाला. पोलिसांनी ड्रायव्हिंग करत असलेल्या मित्राला अटक केली आहे.
जलज आपले तीन मित्र साहिल मेंधा, सार्थक कौशिक, जेडन जिमी यांच्यासह ड्रायव्हिंगसाठी गेला होता. कारमध्ये साहिल आणि जेडन पुढे बसले होते, तर जलज आणि त्याचा मित्र मागे बसले होते. यावेळी १८ वर्षीय साहिलने मद्यपान केले होते असाही दावा केला आहे. ही गाडी विलेपार्ले नजीक एका हॉटेलजवळ डिव्हाडरवर आदळल्याने अपघात झाला. जखमींना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. पण दरम्यान जलज आणि त्याच्या मित्राचा मृत्यू झाला.
जेडन जिमीने दिलेल्या जबाबानुसार साहिलला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जेव्हा साहिल आपल्या मित्राच्या घरातून परतत होता , तेव्हा त्याने मद्यपान केले होते. २२ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता तो जलजच्या घरी आला. त्यानंतर या आम्ही सर्वांनी मध्यरात्री ३.३० वाजता ड्रायव्हिंगला जायचा निर्णय घेतला. पहाटे ४ च्या दरम्यान ते बांद्रा येथे पोहोचले. घरी परत येताना साहिल गाडी चालवत होता. त्याचा गाडीचा स्पीड १२० ते १५० या गतीने होता. त्यामुळे गाडीवरचा कंट्रोल सुटला. जलजच्या वडिलांना न सांगता हे सर्वजण ड्रायव्हींगला गेले होते, असा माहिती जेडन जिमीच्या जबाबानुसार मिळाली.