‘अॅथर’चा तिमाहीत तोटा झाला कमी
दुसऱ्या तिमाहीत तोटा 154 कोटीवर : 898 कोटीचे उत्पन्न
बेंगळूर :
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील निर्माती कंपनी अॅथर एनर्जी यांनी आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून दुसऱ्या तिमाहीमध्ये तोटा कमी झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे.
154 कोटीचा तोटा
आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 154 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत पाहता कंपनीला 197 कोटी रुपयांचा तोटा झाला. मात्र दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नामध्ये 54 टक्के वाढ झाली असून सदरच्या अवधीमध्ये 898 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी हेच उत्पन्न 583 कोटी रुपयांचे होते. अॅथर एनर्जीने आपल्या वित्तीय कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा केलेली पाहायला मिळाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर व चार्जिंग पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ही कंपनी महत्त्वाचे योगदान देत आहे.
समभागाची कामगिरी
कंपनीचा समभाग सोमवारी 4.68 टक्के इतक्या घसरणीसोबत 624 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पाहता समभाग 106 टक्के इतका भरभक्कम वाढला आहे.