For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅथर एनर्जीने 20 हजार वाहनांची घाऊक विक्री नोंदवली

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅथर एनर्जीने 20 हजार वाहनांची घाऊक विक्री नोंदवली
Advertisement

ऑक्टोबरची आकडेवारी सादर : आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी एथर एनर्जीने ऑक्टोबरमध्ये 20,000 हून अधिक वाहनांची विक्री केली आहे, हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा मासिक आकडा आहे. कंपनीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नुकतीच सादर करण्यात आलेली स्कूटर रिझता याने यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या महिन्यात एकूण विक्रीत रिझताचा वाटा सुमारे 60-70 टक्के होता. 30 ऑक्टोबरपर्यंत, अॅथरने भारतभरात 20,000 स्कूटर्सची किरकोळ विक्री केली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. अॅथरच्या सप्टेंबर रिझता लॉन्चनंतर ही वाढ झाली आहे.

Advertisement

कंपनीने सप्टेंबरमध्ये 12,828 वाहने विकली, परिणामी तिचा राष्ट्रीय बाजारातील हिस्सा जुलैमधील 7.9 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 14.3 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे आणि ऑक्टोबरमध्ये या क्षेत्राने वर्षभरात 70 टक्के वाढ नोंदवली. गेल्या महिन्यात, एथर एनर्जीने 4,500 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावसाठी अर्ज दाखल केला. कंपनीकडे सध्या देशभरात 231 अनुभव केंद्रे आणि 2,500 जलद चार्जिंग स्टेशन्स आहेत. एथरची तामिळनाडूच्या होसूरमध्ये उत्पादन सुविधा आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिह्यात आणखी एक उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना आहे.

Advertisement
Tags :

.