For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ramdas Athawale | साताऱ्यात आठवलेंची देसी मेजवानी; कारले, मारला वांगी आणि भाकरीवर ताव

02:32 PM Jun 14, 2026 IST | NEETA POTDAR
ramdas athawale   साताऱ्यात आठवलेंची देसी मेजवानी  कारले  मारला वांगी आणि भाकरीवर ताव
Advertisement

सातारा : सातारा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपाईंचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी घरुन आणलेल्या कारले, वाग्याच्या भाजी भाकरीवर ताव मारला. त्यानंतर त्यांनी जलमंदिर येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

Advertisement

आठवले जिल्हा दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळताच जिल्ह्याच्याकानाकोपऱ्यातून रिपाईंचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच स्वागत रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड, मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले. दुपारी आठवले यांनी सर्व कार्यकर्त्याच्यासोबत अशोकबापू यांनी घरुन आणलेल्या इब्यातली कारल्याची आणि वांग्याचीभाजी भाकरीसोबत जेवण केले.

त्यानंतर त्यांनी जलमंदिर येथे जावून खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अण्णा वायदंडे, अप्पा तुपे, स्वप्नील गायकवाड, प्रतिक गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

आंदोलने आजपर्यंत अनेक झालेली आहेत. आंदोलन हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. अनेक पार्ष्या स्थापन होतात. जशी आम आदमी पार्टी स्थापन झाली तशीच काक्रोज जनता पार्टी स्थापन झाली असल्याचे आठवले म्हणाले.

Advertisement
Tags :

.