For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अथर्व वेंकटेश, लीह आर जोसेफ विजेते

10:24 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अथर्व वेंकटेश  लीह आर जोसेफ विजेते
Advertisement

गिरीस्तुती राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

Advertisement

बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश व लीह आर जोसेफ या बुद्धिबळ पटूंनी  बाजी मारीत विजेतेपद मिळविले. शास्त्राrनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे झालेल्या कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुला गट फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या अथर्व वेंकटेश याने पहिला तर म्हैसूरच्या ईश्वर विरप्पन आयप्पन व बेंगळूर अर्बनच्या समक्ष अशोक याने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत बेंगळूर अर्बनच्या लीह आर जोसेफ हिने पहिला तर बेंगळूरच्या इंदुषीतला व उत्तर कन्नडच्या अन्विता साथी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.

11 वर्षाखालील फिडे रेटेड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात इंद्रजीत मजुमदार (बेंगळूर अर्बन), ईशान भन्साली (बेंगळूर अर्बन), आरव दास (बेंगळूर), ईशान ए (बेंगळूर अर्बन), विवान होटा (बेंगळूर), ऊद्रांश पी. एस. (बेंगळूर), समर्थ नटराज नायडू (बेंगळूर अर्बन), विहान आदर्श लोबो (मंगळूर), विहान शेट्टी (मंगळूर), अभिनव आनंद (बेंगळूर अर्बन), वेंकट नागा कार्तिक मल्लाडी (बेंगळूर अर्बन) आणि अशांक कैलास गोलीवडेकर (बेंगळूर अर्बन) यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक पटकाविला. 11 वर्षाखालील मुलींच्या गटात आराध्या गौडा (बेंगळूर अर्बन), श्रेया राजेश (बेंगळूर), शशीनी पुवी (बेंगळूर अर्बन), अर्ना जैन (बेंगळूर), रिशिता महाजन (बेंगळूर), श्राव्या वैद्य (बेंगळूर), पेन्मेस्ता सर्वनी (बेंगळूर), दिशी मखीजा (बेंगळूर), निसर्गा गिरिषा प्रिया (बेंगळूर), राजेश्वरी अय्यप्पन (म्हैसूर), नेसरा अऊण कुमार (बेंगळूर अर्बन) आणि दत्ता माही (बेंगळूर अर्बन) यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक पटकाविला. या दोन्ही गटातील चौथ्या ते पंधराव्या क्रमांकांच्या विजेत्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे  5 हजार,  3,500 ऊपये, 2500, 2000, 1500, 1500, 11 ते 15 वयाक्रमांकासाठी प्रत्येकी 1000, ऊपये बक्षीस देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

Advertisement

याशिवाय मुलांच्या विभागातील 9 वर्षांखालील वयोगटातील विवान पांडे ( बेंगळूर अर्बन), अद्विक अभिनव कृष्णा (बेंगळूर अर्बन), अवनीश देवाडीगा (बेंगळूर अर्बन),  हर्षित राम बी (बेंगळूर ),  चयांक रमेश (बेंगळूर अर्बन), अरविंद एस. आर.(बेंगळूर ग्रामीण),  ध्रुव के. दिलीप (बेंगळूर अर्बन), हिमांश कार्तिकेय अलाहरी (बेंगळूर अर्बन),  निश्चित गुऊकर के (चिक्कमंगळूर), माधवा व्यासराज तंत्रि (उडपी) या 10 उत्कृष्ट बुद्धीबळपटूंना तसेच 7 वर्षाखालील वयोगटातील परीक्षित एस. एम. (बेळगाव), राजवीर गिरीश बाचीकर (बेळगाव) युवान प्रकाश महांतशेट्टी (बेळगाव), समर्थ पोळ (बेळगाव), यश महाजन (बेळगाव), शार्विल शेडबाळकर (बेळगाव), वीरभूषण यल्लम्मनवर (बेळगाव) तसेच मोहक पांडे (बेळगाव) ह्या अनुक्रमे पहिला ते आठवा क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले. मुलींच्या 9 वर्षाखालील वयोगटात चाऊशी बी (बेंगळूर अर्बन), अवयुक्ता नायर (बेंगळूर), हनिष्का मिश्रा (बेंगळूर), दीप्ती जयप्रकाश (बेंगळूर अर्बन),  राधिका रॉय (बेंगळूर), आध्या हेग्गेरी (हावेरी), आरोही कुलकर्णी (बेंगळूर), आरोही पाटील (बेळगाव), मिशीका सिंघानिया (हुबळी) व सन्नीधी भोगल (बळळारी) यांनी अनुक्रमे पहिला ते दहावा क्रमांक पटकविलेल्या बुद्धीबळपटूंचा तसेच 7 वर्षांखालील मुलींच्या गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविलेल्या विक्षिता टी (शिवमोगा) व इशानवी संतोषकुमार (बेळगाव) यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आले.

विजेत्या बुद्धिबळपटूना एमएलआयआरसी, बेळगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कृष्ण कुमार, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे ( बीडीसीए) अध्यक्ष दिनेश बिराडे यांच्या हस्ते अनुक्रमे 12 हजार, 8 हजार, 6 हजार ऊपये आणि चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष एस. जी बागेवाडी, इंडस इंटरनॅशनलचे उज्वल दास, गुजराती नवरात्री उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश लड्डा, उपाध्यक्ष पंकज शाह, सचिव विजय भद्रा, मंडळाचे सदस्य बिपीनभाई पटेल, बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी, गिरीस्तुती चेकमेट स्कूल ऑफ चेस फौंडेशनचे संचालक आणि ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक गिरीश बाचीकर, मुख्य अर्बीटर प्रमोदराज मोरे (आयए) उप मुख्य अर्बीटर प्रणेश यादव के (आयए) आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेसाठी मुख्य अर्बीटर म्हणून प्रमोदराज मोरे (आयए), उप मुख्य अर्बीटर म्हणून प्रणेश यादव के ( आयए) तर अर्बीटर म्हणून आकाश मडीवाळर (एसएनए) व सक्षम जाधव (एसएनए) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन शालगार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीडीसीए पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.