एटीएफच्या किमतीत मोठी वाढ, कमर्शियल सिलिंडर स्वस्त
एटीएफ 7.5 टक्क्यांनी महाग : कमर्शियल सिलिंडर 58.5 रुपयांनी स्वस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मंगळवारी 7.5 टक्क्यांची मोठी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे कमर्शियल सिलिंडर 58.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरांमध्ये झालेल्या बदलामुळे किमतींमध्ये उतारचढाव झाला आहे. तर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही.
नवी दिल्लीत विमानो•ाण टर्बाइन इंधन (एटीएफ)ची किंमत 6,271.5 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 7.5 टक्क्यांनी वाढून 89,344.05 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. ही वृद्धी एप्रिलपासून आतापर्यंत तीन मासिक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या एकूण कपातीच्या निम्म्याइतकी आहे. एटीएफमधील किंमतवाढ मागील महिन्यात इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने झाली आहे. या वृद्धीमुळे कमर्शियल एअरलाइन्सवरील भार वाढणार आहे.
तर तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 58.5 रुपयांची कपात केली आहे. आता नवी दिल्लीत कमर्शियल सिलिंडर 1665 रुपये तर मुंबईत 1616 रुपयांमध्ये मिळणार आहे. कमर्शियल सिलिंडरमध्ये सलग चौथ्यांदा दरकपात करण्यात आली आहे. यापूर्वी 1 जून रोजी कमर्शियल सिलिंडर 24 रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यापूर्वी 1 मे रोजी 14.50 रुपये तर 1 एप्रिल रोजी 41 रुपयांनी किंमत कमी करण्यात आली होती. धन (एटीएफ)ची किंमत 6,271.5 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 7.5 टक्क्यांनी वाढून 89,344.05 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. ही वृद्धी एप्रिलपासून आतापर्यंत तीन मासिक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या एकूण कपातीच्या निम्म्याइतकी आहे. एटीएफमधील किंमतवाढ मागील महिन्यात इराणवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्याने झाली आहे. या वृद्धीमुळे कमर्शियल एअरलाइन्सवरील भार वाढणार आहे.
तर तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 58.5 रुपयांची कपात केली आहे. आता नवी दिल्लीत कमर्शियल सिलिंडर 1665 रुपये तर मुंबईत 1616 रुपयांमध्ये मिळणार आहे. कमर्शियल सिलिंडरमध्ये सलग चौथ्यांदा दरकपात करण्यात आली आहे. यापूर्वी 1 जून रोजी कमर्शियल सिलिंडर 24 रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यापूर्वी 1 मे रोजी 14.50 रुपये तर 1 एप्रिल रोजी 41 रुपयांनी किंमत कमी करण्यात आली होती.