For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एटीएफ’ जेट इंधन 5 टक्क्यांनी महाग

06:41 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एटीएफ’ जेट इंधन 5 टक्क्यांनी महाग
Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी अंमलबजावणी : सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या (एटीएफ) दरात शुक्रवारी 5 टक्क्यांनी वाढ झाली. जागतिक ऊर्जा दरवाढीनुसार तेल कंपन्यांनी समायोजन केल्यामुळे ही सलग दुसऱ्या महिन्याची दरवाढ आहे. तथापि, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठीच्या एटीएफच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, देशांतर्गत विमान भाडेवाढ होणार नाही अशी अपेक्षा आहे. 1 मे रोजीच्या निर्णयानंतर दिल्लीत एटीएफच्या दरात प्रतिकिलोलिटर 76.55 अमेरिकी डॉलरने म्हणजेच 5.33 टक्क्यांनी वाढ होऊन ते प्रतिकिलोलिटर 1511.86 अमेरिकी डॉलर झाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.