कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जलतरणपटू ज्योती कोरीला अटल अलंकार पुरस्कार

08:43 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खा. प्रभाकर कोरे यांच्याकडून सन्मान

Advertisement

बेळगाव : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे श्रीमंत राजमाता विजयाराजे सिंधिया फाउंडेशन  व अटल भारत स्पोर्ट्स व कल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बेळगावच्या वैद्यकीय अधिकारी ज्योती कोरी (होसट्टी) यांना अटल अलंकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल स्विमर्स, व एक्वेरियस क्लबतर्फे त्यांचा खास सत्कार करण्यात आला. बेळगावच्या वैद्यकीय सरकारी कर्मचारी ज्योती कोर (होसट्टी) त्यांनी जलतरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेऊन 67 सुवर्ण, 14 रेप्य, व 8 कास्यपदक पटकावीत यश संपादन केले होते. या कामगिरीची दखल घेऊन उज्जैन मध्यप्रदेशातील विजयाराजे शिंदे फाउंडेशन तर्फे अटल अलंकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन ज्योती कोरे यांचा सन्मान करण्यात आला. ज्योती कोरी यानी अटल अलंकार पुरस्कार दिल्याबद्दल जेएनएमसी जलतरण तलावर एका कार्यक्रमात माजी खास. व केएलई संस्थेचे चेअरमन प्रभाकर कोरे, जयंत हुंबरवाडी, उमेश कलघटगी व इतर मान्यवरांच्या हस्ते तिचा शाल व श्रीफळ देऊन खास सत्कार करण्यात आला. ज्योती कोरी या  जेएनएमसी जलतरण तलावात नेहमी सराव करीत असून त्यांना प्रशिक्षक अक्षय शिरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. तिला अविनाश पोतदार, माखी कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article