महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अॅस्ट्राजेनेका कोरोना लस मागे घेणार

06:55 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ब्रिटनची फार्मा कंपनी अॅस्ट्राजेनेकाने जगभरातून कोविड-19 लसीची खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारतात बनवलेली कोविशील्ड लस देखील आहे. काही दिवसांपूर्वीच या औषध कंपनीने लसीचे धोकादायक दुष्परिणाम न्यायालयात कबूल केले होते. मात्र, आता कंपनीने ही लस बाजारातून काढून टाकण्यामागे आणखी काही कारणे दिली आहेत.

Advertisement

बाजारात आवश्यकतेपेक्षा जास्त लस उपलब्ध असल्यामुळे कंपनीने सर्व लसी बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने या लसीचे दुष्परिणाम असल्याची बाब मान्य केली होती. रक्त गोठणे आणि लसीमुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात, असे न्यायालयात सांगण्यात आले होते. अॅस्ट्राजेनेका लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. एप्रिल 2021 मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीला ही लस मिळाली. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावही झाला होता.

अॅस्ट्राजेनेकाने 2020 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोना लस तयार केली. त्याचे सूत्र वापरून सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशील्ड नावाची लस तयार करते. या निर्मितीनंतर अॅस्ट्राजेनेका लस भारतात कोविशील्ड या नावाने वापरली जात होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article