For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यरगट्टीजवळ मोटारसायकल अपघातात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

11:16 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
यरगट्टीजवळ मोटारसायकल अपघातात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
Advertisement

वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे अपघात

Advertisement

बेळगाव : शनिवारी रात्री यरगट्टीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात दोडवाड, ता. बैलहोंगल पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. मुरगोड पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून हेल्मेट परिधान न केल्यामुळे या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. विजयकुमार मेकळी (वय 51) असे त्या दुर्दैवी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. यरगट्टी येथे त्यांचे वास्तव्य होते. शनिवारी रात्री दोडवाड पोलीस स्थानकातील काम आटोपून आपल्या मोटारसायकलवरून घरी जाताना यरगट्टीजवळ वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. डोक्यावर जर हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद हे हेल्मेटसाठी सुरुवातीपासूनच आग्रही आहेत. आपल्या गोकाक भेटीच्या वेळी एका पोलिसाने हेल्मेट परिधान केले नाही म्हणून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Advertisement

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलिसांना दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे असल्याची सूचना करण्यात आली आहे. या सूचनेचे पालन न झाल्यामुळे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करण्यास असमर्थ ठरलेले दोडवाडचे पोलीस उपनिरीक्षक नंदीश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.