सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमासाठी लाख मोलाची मदत
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मदतीचा हात
ओटवणे : प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची समाजातील सर्व घटकांकडून दखल घेतली जात असून त्यांच्या विविध समाजपयोगी उपक्रमासाठी उत्स्फूर्तपणे सर्व घटकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करीत त्यांच्या विविध उपक्रमांसाठी एक लाख रुपयांची मदत दिली.नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ यांनी हा एक लाख रुपयांचा धनादेश सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विनोद राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून यापुढेही सामाजिक बांधिलकीच त्यांच्या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या सहकार्याबद्दल सामाजिक बांधिलकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी रवींद्र चव्हाण तसेच विनोद राऊळ यांचे आभार मानले.