महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानात राहून रचत होते कारनामे

Advertisement

वृत्तसंस्था /बारामुल्ला

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पोलिसांनी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या पाच दहशतवाद्यांची कोट्यावधी ऊपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बारामुल्ला न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने पाच दहशतवाद्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. बशीर अहमद गनी, मेहराजुद्दीन लोन, गुलाम मोहम्मद, रेहमान भट्ट आणि रशीद लोन या पाच दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त केली आहे. हे सर्वजण मूळचे बारामुल्लाच्या विविध भागातील रहिवासी असून ते पाकिस्तानमध्ये राहून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यात व्यग्र असतात.

केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबरोबरच खोऱ्यात असलेल्या त्यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत. या माध्यमातून त्यांचे आर्थिक स्त्रोत रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता सीआरपीसी कलम 83 अंतर्गत दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविऊद्ध भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला होता.

काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना तपासादरम्यान दहशतवाद्यांच्या मालमत्तेची माहिती मिळाली. यानंतर दहशतवाद्यांच्या मालमत्तेची छाननी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्याची पोलिसांची बांधिलकी या कारवाईतून दिसून येते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article