जमीन हडपप्रकरणी 6.27 कोटीची मालमत्ता जप्त
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाची कारवाई
पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने अर्जुन पुरस्कार विजेत्या डॉ. ओटिलिया मास्करेन्हास यांच्या पूर्वजांची जमीन हडपल्याप्रकरणी कारवाई केली आहे. ईडीने या घोटाळ्यातील मुख्य संशयित ईस्टीवन डिसोझा आणि त्याच्या साथीदारांच्या 6 कोटी 27 लाख ऊपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. राज्यातील जमीन बळकावण्याच्या प्रकरणात ईडीने आपली कारवाई अधिक तीव्र केली असून जमीन घोटाळ्यातील आतापर्यंतच्या जप्तीचा एकूण आकडा तब्बल 78 कोटी 14 लाख ऊपयांवर पोहोचला आहे.
जमीन माफियांची पाळेमुळे राज्यातील विविध पोलिसस्थानकांबरोबरच आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केलेल्या गुह्यांमध्ये आहेत. ईस्टीवन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि जमीन घोटाळ्यातील अन्य संशयित मोहम्मद सुहेल यांनी नियोजनबद्ध गोव्यातील अनेक जमिनींचे व्यवहार बेकायदेशीरपणे केले. त्यांनी मूळ जमीन मालकांची बनावट ओळखपत्रे तयार केली आणि बनावट विक्री करार तसेच बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीच्या साहाय्याने या जमिनी स्वत:च्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयितांनी केवळ जमिनी हडपल्या नाहीत, तर या बेकायदेशीर मालमत्तांच्या आधारे अनेक खरेदीदारांची फसवणूक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचेही ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
यापूर्वी ईडीने या प्रकरणात 11 कोटी 82 लाख आणि 60 कोटी 05 लाख ऊपयांच्या मालमत्ता संबंधित प्राधिकरणाने कायम जप्त केली आहे. संशयितांनी आणखी तीन मालमत्ता आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे वळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. या मालमत्ता गुह्यातून मिळालेले उत्पन्न’ असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ईडीने त्या तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा खटला गोव्यातील विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू असून ईडीने यापूर्वीच आरोपींविऊद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून सुनावणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रॅकेटमध्ये अजून काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ईडी त्यादृष्टीने अधिक तपास करत आहे.