विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना दिल्यास भावी संशोधक घडतील
आमदार आसगावकर यांचे प्रतिपादन
करवीर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण
कोल्हापूर
शालेय जीवनात विद्यार्थ्याच्या जिज्ञासू वृत्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना दिल्यास भविष्यातील संशोधक घडतील आसा विश्वास पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केला.
शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व सांगरूळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगरूळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करवीर तालुकास्तरीय विज्ञान विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे होते .
स्वागत सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस एम नाळे यांनी केले .प्रास्ताविक करताना करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील यांनी भविष्यातील स्पर्धेची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जागृत ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले. यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य ल खाडे विस्तार अधिकारी विजय ओतारी व परीक्षक एस बी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष के ना जाधव खजाणीस डी जी खाडे संचालक इंदुताई आसगावकर आनंदा कसोटे राजेंद्र सूर्यवंशी डी आर खामकर एम एस महाडिक विस्तार अधिकारी विजय ओतारी प्रकाश आंग्रे अर्चना पात्रे आनंदराव आकुर्डेकर सुजाता गायकवाड संजय पाटील केंद्रप्रमुख संभाजी पाटील यांचे सह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .आभार पर्यवेक्षक एस के पाटील यांनी मानले .सूत्रसंचालन एल एस कोळी यांनी केले
गटवर प्रथम तीन क्रमांकाचे विजेते पुढील प्रमाणे
माध्यमिक विद्यार्थी विभाग
पवनराज म्हाळुंगेकर चन्नीशेट्टी विद्यालय निगवे खालसा (बहुउद्देशीय शेती यंत्र ) श्रेयशी जाधव न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी (सेविंग द कॅटर्स फ्रॉम फायर ) सुमित काळे व आयुष म्हेतर सांगरूळ हायस्कूल (ड्राय अँड वेट वेस्ट मॅनेजमेंट ) आयुष बापट राजर्षी शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर (आपत्ती व्यवस्थापन )
प्राथमिक विद्यार्थी विभाग
समीक्षा पाटील व मनस्वी पाटील भैरवनाथ हायस्कूल वरणगे (अपघात सुचक यंत्र )
निरजा कुंभार भैरवनाथ हायस्कूल महे (भांडी स्वच्छता यंत्र ) श्रावणी सातपुते व स्वरांजली बिरंजे (विद्या मंदिर वाकरे ) अजिंक्य तेली बालिंगा हायस्कूल (विद्यार्थी सुरक्षा स्कूल बॅग )
माध्यमिक विद्यार्थी दिव्यांग विभाग
जान्हवी कांबळे भैरवनाथ हायस्कूल महे (बहुपयोगी छत्री ) साईराज कांबळे ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वडणगे निगवे (पावसापासून कपडे सुरक्षित ठेवणारे यंत्र )
दिव्यांग प्राथमिक विभाग
तन्मय कुरणे श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल गोकुळ शिरगाव (कचरा व्यवस्थापन )जसपित कौर बावरी न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव (मॅग्नेटिक व्हायकल )
माध्यमिक शिक्षक विभाग
वैशाली सम्मानवार (भैरवनाथ विद्यालय भुयेवाडी ) यशवंत तळेकर ( कुंभी कासारी विद्यानिकेतन कुडित्रे ) सागर थोरात (हणमंतवाडी हायस्कूल )
प्राथमिक शिक्षक विभाग
सर्जेराव सुतार (विद्या मंदिर कोथळी )
दिपाली कतगर ( विद्या मंदिर नेर्ली )शुभांगी पाटील (विद्या मंदिर सोनतळी )
प्रयोगशाळा परिचर
जितेंद्र काटकर (ज्योतिर्लिंग विद्या मंदिर वडणगे निगवे ) सुहास चव्हाण व सदाशिव औरनाळे (देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल आर के नगर )
प्रश्नमंजुषा
वेदश्री बजागे व तेजस्विनी गवळी (श्री हनुमान हायस्कूल केर्ले )मनस्वी पाटील व संचिता चौगले (खेबवडे हायस्कूल ) संस्कार कुलकर्णी व आयुष घुंगुरकर (डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे )