For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकरुपी पुतळा उभारणार

05:44 PM Nov 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये डॉ  बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकरुपी पुतळा उभारणार
Advertisement

सावंतवाडी येथील मेळाव्यात मंत्री केसरकरांचे प्रतिपादन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे जेणेकरून पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा जागर घराघरात पोहोचावा असे आपले धोरण आहे. असे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल , शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते . महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजयी करण्याचा निर्धार यावेळी मागासवर्गीय सेलच्या वतीने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मागासवर्गीय सेलचे तथा दलित मित्र पुरस्कार विजेते गुंडू जाधव , माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी,भाजप मागासवर्गीय सेलचे दलित मित्र पुरस्कार विजेते चंद्रकांत जाधव , लाडू जाधव., सोनिया मटकर ,तानाजी कुणकेरकर ,गुरु कासले ,अक्षय जाधव ,सुरेश कदम,अथर्व जाधव ,नारायण कराडकर ,उमेश मटकर ,स्वप्निल मटकर,आधी उपस्थित होते. यावेळी श्री केसरकर पुढे म्हणाले मी या भागाचा विकास केला आहे . त्यामुळे मला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले . यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.