कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मातोंड सातेरी चरणी लीन

09:01 PM Nov 06, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वेंगुर्ले : प्रतिनिधी

Advertisement

देवी, आई...राज्यातील बळीराजावर आलेले संकट दूर कर! आमच्यासारख्या लोकप्रतिनीधींकडून जनतेची निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे सेवा घडत राहो, यासाठी आम्हाला सद्बुद्धी व ताकद दे,असे साकडे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी मातोंड येथील सातेरी देवीच्या चरणी घातले. मातोंडच्या प्रसिद्ध लोटांगणाच्या जत्रोत्सवाला सहकुटुंब उपस्थिती दर्शवून त्यांनी यावर्षीही दर्शन घेतले.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा विराजमान झालेले देशातील सर्वांत कमी वयाचे सभापती अशी ओळख असलेले राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबियांचे आणि मातोंडचे अत्यंत जवळचे नाते. मातोंड ग्रामदेवता देवी सातेरी त्यांची कुलदेवता असल्याने नार्वेकर कुटुंबीय अनेक वर्षापासून सातेरीचे दर्शन घेण्यासाठी मातोंडला येतात. यावर्षीही त्यांनी आपल्या कुलदेवतेच्या जत्रोत्सवाला सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन घेतले.मातोंड गावातर्फे नार्वेकर व त्यांच्या कुटुंबाचे स्वागत करण्यात आले. यावेळी नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर, मातोंड सातेरी देवस्थान कमिटी अध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परब, देवस्थानचे गावकर रमाकांत परब, उदय परब, सुधाकर परब, तुकाराम परब, रविकिरण परब, दिगंबर परब, जयवंत परब, संतोष परब, सुनील परब, दादा म्हालटकर, अभय परब, रावजी परब, नितीन परब, किशोर परब, उपसरपंच आनंद परब, जगदीश परब, ग्रा. पं. सदस्य दीपेश परब, तालुका खरेदी-विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सचिव एम. जी. मातोंडकर, महेश पाटकर, गायेश परब, देवा कांबळी, नंदकिशोर परब, सुधीर मातोंडकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, वेंगुर्ले पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, ग्रामविकास अधिकारी आनंद इंगळे, पोलीस पाटील सागर परब आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update # konkan update # Rahul Narvekar # assembly speaker
Next Article