लाडकी बहीण’मुळे विधानसभेचा निकाल धक्कादायक
कोल्हापूर :
लाडकी बहीण योजनेमुळे कोणतीही जात, धर्म, पंथ न पाहता 50 टक्के महिलांनी तसेच 22 टक्के मुस्लीम मतदारांनी युतीला मतदान केल्याने, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावे, असा सूर महिलांकडून पुढे येत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले.
अमृतमहोत्सवी ब्राम्हणसभा करवीर (मंगलधाम) कोल्हापूर, महालक्ष्मी को ऑप बँक लि. व तेंडुलकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्dयानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘2024 विधानसभेच्या निकालाचा अर्थं काय’ या विषयावर ते बोलत होते. त्यांची मुलाखत थिंक बँकेचे विनायक पाचलग यांनी घेतली होती. प्रायव्हेट हायस्कूल येथे व्याख्यानमाला सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे अल्पउत्पन्न असलेल्या वर्गाची दिवाळी आनंदाने झाली. तर 50 टक्के एसटी तिकिटामुळे सर्वसामान्य वर्गातील महिलांना आपल्या यात्रा, वारी सारखे प्रवास करणे शक्य झाल्याने, महिलांनी भरभरून मतदान केल्याने युतीला यश मिळाले. तसेच अर्थचलनाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार व अजित पवार तसेच उध्दव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या राजकीय युध्दाचे यश कसे व कोणाला मिळाले? याचे उत्तर देताना ते म्हणाले, यामध्ये उपमुख्dयामंत्री अजित पवार व काळजीवाहू मुख्dयामंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी ठरले आहेत. कारण अजित पवार यांना घड्याळाचे चिन्ह मिळाले. तसेच जुने सहकारी उमेदवार म्हणून उभा करून विजयी झाले. तर शरद पवार यांचे वय व नवख्dया उमेदवारांना मतदारांनी नाकारले. तर मुस्लीम व काँग्रेसमुळे शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी होती. तर एकनाथ शिंदे हे निष्ठावंत शिवसैनिक व तळागाळापर्यंत पोहोचलेले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे त्यांनी शिवसैनिकांना शाश्वत केले होते. याचाच फायदा अजित पवार व एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.
सहकार क्षेत्रामुळे भाजपला फायदा झाला काय याचे उत्तर देताना दिक्षीत म्हणाले, 2014 पेक्षा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपची टक्केवारी घसरली आहे. तीन राज्यामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक भाजपने मते घेतले आहे. तर महाराष्ट्रात लाडकी बहीणमुळे भाजपची टक्केवारी 26 वरून 32 टक्के झाली आहे. यामध्ये फडणवीस यांचे कँम्पेनिंग, एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहीण व विदर्भातील आकर्षित केलेले मराठा मतदार तसेच अजित पवार यांचे धर्मनिरपेक्षता उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत फायदा झाला आहे.
निवडणुकीत आरएसएसचा सहभाग, पैसे वाटप यावर ते म्हणाले, हिंदुत्वाची खिल्ली न उडवता त्याचा आदर सर्वांनी करावा. शैक्षणिक संघटना ते ग्रामीण सोसायटीपर्यंत निवडणुकीमध्ये पैसे वाटप होत असते. हे वास्तव्य असल्याचे पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे. परिचय अॅड. रवि शिराळकर, आभार श्रीकांत लिमये तर सूत्रसंचालन डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी केले. यावेळी प्रकाश तेंडुलकर, अॅड. राजेंद्र किंकर, डॉ. उदय कुलकणीं, अॅड. विवेक शुक्ल, केदार तेंडुलकर, जयंत तेंडुलकर आदी उपस्थित होते.