For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिक्कीम, अरुणाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल

06:25 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिक्कीम  अरुणाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल
Advertisement

लोकसभेची मतमोजणी 4 जून रोजीच होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशात लोकसभा निवडणुकीसोबतच अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत. यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचाही समावेश आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. याच काळात दोन्ही राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदानही झाले. या दोन्ही राज्यांमधील विधानसभेचे निकाल रविवार, 2 जूनला जाहीर होतील. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी 4 जून ही निकालाची तारीख निश्चित केली असली तरी नंतर ती बदलण्यात आली.

Advertisement

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. याशिवाय येथे लोकसभेच्या दोन जागा आहेत. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर भाजपने 41 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. तर काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय जनता दल (युनायटेड) सात, एनपीपी पाच, पीपीए एक आणि दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

अरुणाचल प्रदेशमध्ये मतमोजणीसाठी 2 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. विधानसभेच्या एकूण 60 पैकी 50 मतदारसंघांसाठी राज्यातील 24 केंद्रांवर रविवारी मतमोजणी होणार आहे. तर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 25 केंद्रांवर 4 जून रोजी पार पडणार असल्याची माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी लिकेन कोयू यांनी दिली आहे. राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपने 60 पैकी 10 जागांवर यापूर्वीच बिनविरोध विजय मिळविला आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 133 उमेदवार उभे होते, तर लोकसभेच्या दोन जागांसाठी 14 उमेदवार मैदानात होते. अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नबाम तुकी समवेत 8 उमेदवार उभे आहेत. तर अरुणाचल पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार तापिर गाओ आणि काँग्रेस उपाध्यक्ष बोसीराम सिरम यांच्यासमवेत 6 उमेदवार उभे राहिले होते.

सिक्कीम विधानसभा

सिक्कीममध्ये विधानसभेच्या 32 जागा आहेत. याशिवाय लोकसभेची एक जागा आहे. अऊणाचल प्रदेशप्रमाणे येथेही 19 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. सिक्कीम विधानसभेचा कार्यकाळ 2 जून 2024 रोजी संपणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने राज्यात सरकार स्थापन करत प्रेमसिंग तमांग मुख्यमंत्री झाले. यावेळीही सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट यांच्यातच लढत आहे.

Advertisement
Tags :

.