For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा कामकाज समितीची 21 रोजी बैठक

06:45 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधानसभा  कामकाज समितीची 21 रोजी बैठक
Advertisement

पणजी (प्रतिनिधी) : शुक्रवार दि. 21 ऑगस्ट रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात विधानसभेच्या एकूण कामकाजाची रुपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. त्यावर विचार केला जाणार असून 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर असे एकूण तीन दिवस अधिवेशन घेण्यात येणार आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवावा आणि किमान 15 दिवस तरी अधिवेशन चालवावे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. सहा आमदारांनी राज्यपालांना निवेदन देऊन अधिवेशन कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. सभापती गणेश गावकर यांनाही मागणीचे निवेदन सादर केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.