मालगावमध्ये किरकोळ कारणातून मारहाण
मिरज :
तालुक्यातील मालगाव येथे पानटपरीजवळ थांबून पान खाऊ नकोस, असे सांगितल्याच्या कारणातून हाताला चावा घेऊन मारहाण केली. त्यानंतर फोनवरुन शिवीगाळ करून पुन्हा भांडणाचा वाद काढून पुन्हा मारहाण करण्यात आली. याबाबत महादेव दत्ता नरुटे (वय ४२, रा. बिरोबा मंदिरजवळ, मालगाव) यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार संशयीत योगेश अवगडी भानुसे, ानुसे, नवलू दादू नरुटे, संतोष दादू नरुटे व रेवण नरुटे अशा चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, महादेव नरुटे यांना मारहाण होत असताना भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलासही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचे तक्रारीत नमुद आहे.
मालगाव येथील होळकर चौकात एका पानटपरीवर संशयीत योगेश भानुसे हा पानखात बांबला होता. यावेळी महादेव नरुटे यांनी त्याला पान का खातोस, असे म्हटल्यानंतर योगेशला राग आला. त्याने महादेव यांच्या हाताला चावा घेऊन पलायन केले.
पुन्हा रात्री आठ वाजता त्याच चौकात महादेव हे आले. त्यांनी संशयीत नवलू नरुटे यास तू मला फोनवरुन शिवी का दिली, असा जाब विचारला. त्यानंतर पुन्हा दुपारच्या भांडणाचा राग काढून संशयीत चौघांनी संगनमत करत त्यांना मारहाण केली.
यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महादेव नरुटे यांच्या पत्नीला व मुलालाही मारहाण करुन जखमी करण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे. चौघा संशयितांवर गुन्हा नोंद आहे.