महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूर पोलिसांसाठी आसाम रायफल्सची धाव

06:33 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोरेहमध्ये चकमकीवेळी सुरक्षित काढले बाहेर

Advertisement

वृत्तसंस्था/ मोरेह

Advertisement

आसाम रायफल्सच्या जवानांनी मणिपूर पोलिसांच्या पथकाला उग्रवाद्यांच्या हल्ल्यापासून वाचविले आहे. पोलिसांना देण्यात आलेल्या कव्हर फायरिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात जवान जखमी पोलिसांना चिलखती वाहनांमध्ये बसविताना दिसून येत आहेत.

इंफाळ आणि भारत-म्यानमार सीमेवरील मोरेह यांना जोडणाऱ्या महामार्गावरून पोलिसांचा ताफा जात असताना लपून बसलेल्या उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले होते. मोरेह येथे पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर तेथील पोलिसांच्या मदतीसाठी हा ताफा जात होता, परंतु उग्रवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्याला लक्ष्य करत गोळीबार केला होता.

मणिपूरमध्ये जातीय आरक्षणावरून कुकी आणि मैतेई समुदायांदरम्यान 3 मेपासून  हिंसा सुरु आहे. या हिंसेत आतापर्यंत 187 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article