For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसामचे मंत्री अतुल बोरांना मिळाली जीवे मारण्याची धमकी

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
आसामचे मंत्री अतुल बोरांना मिळाली जीवे मारण्याची धमकी
Advertisement

पोलिसांकडून आरोपी ताब्यात

Advertisement

गुवाहाटी : सोशल मीडियावर आसामचे मंत्री अतुल बोरा यांना धमकी दिल्याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी यासंबंधी गुरुवारी माहिती दिली आहे. आसाम पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी चौकशी सुरू केली होती. शिवसागर जिल्ह्यातील बामुन मोरन गावामधील 31 वर्षीय युवकाला फेसबुक पोस्टप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या फेसबुक पोस्टद्वारे त्याने कथित स्वरुपात राज्याच्या कृषीमंत्र्यांना धमकी दिली होती. बोरा हे राज्यात भाजप सरकारमधील मंत्री असण्यासोबत आसाम गण परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत. यापूर्वी प्रतिबंधित उल्फाचा सदस्य असल्याचा दावा करत एका इसमाने बोरा यांच्या शासकीय निवासस्थानी बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. लोकप्रतिनिधींच्या विरोधात अशाप्रकारची कुठलीही धमकी अस्वीकारार्ह असल्याचे पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.