बॅ. खर्डेकर कॉलेज रोडवरील डांबरीकरण कामाचा शुभारंभ
वेंगुर्ले (वार्ताहर)-
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान निधीतून सुमारे 35 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेल्या वेंगुर्ले शहरातील बॅ. खर्डेकर कॉलेज रोडवरील गाडीअड्डा तिठा ते रहाटाची विहीरपर्यंत जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वेंगुर्ला तालुका आँटो रिक्षा युनियन संघटनेचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भगवान उर्फ भाई मोरजे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून झाला .
या प्रसंगी शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील नागरीकांना पायाभुत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्याने निधी दिला जात आहे. वेंगुर्ले शहरातील कांही रस्त्याची कामे व डागडुजी करावयाची आहे, अशी कामे श्री. केसरकर यांना सांगितलेली असून लवकरच ती कामे पुर्ण करण्यात येतील अशी माहिती या प्रसंगी दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, युवक शहर अध्यक्ष संतोष परब, तसेच राजू परब, संजय परब, प्रभाकर पडते यासह गाडीअड्डा येथील आँटो रिक्षा संघटनेचे सदस्य व स्थानिक नागरीक उपस्थित होते.