For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिले रेल्वेगेट फाटकावरील डांबरीकरण

10:55 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिले रेल्वेगेट फाटकावरील डांबरीकरण
Advertisement

रेल्वेगेटजवळील अडचण दूर झाल्याने प्रवाशात समाधान

Advertisement

बेळगाव : शहरातील रेल्वेगेटजवळील फाटक उंच झाले आहेत. त्यामुळे फाटकावरुन ये-जा करताना दुचाकी व चारचाकी स्वारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. फाटक उंच झाल्याने रेल्वेगेटमधून जाताना अपघाताचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन पहिल्या रेल्वेगेटजवळील अडचण मनपाने दूर केली आहे. फाटकाजवळील रस्त्यांना जोडणाऱ्या पॅसेजमध्ये ख•s निर्माण झाले होते. अनेक फाटकांवर अशीच परिस्थिती असून टप्प्याटप्प्याने ती दूर करणार असल्याचे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सांगितले. सध्या रेल्वेचे दुपदरीकरण झाले आहे. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने केवळ आपल्या हद्दीत खडी टाकून फाटक उंच केले आहेत. परिणामी वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे गेट बंद झाल्यानंतर वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी अनेक वाहन चालकांना त्या फाटकातून वाहन पुढे नेताना कसरत करावी लागत आहे. याची दखल घेत महानगरपालिकेने फाटक व रस्त्यामधील खोलगट भागामध्ये डांबरीकरण केले. त्यामुळे आता वाहने चालविणे सुलभ झाले असून वाहन चालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.