For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हब्बनहट्टी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण

10:22 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
हब्बनहट्टी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
Advertisement

महाशिवरात्री यात्रेपूर्वी रस्ता झाल्याने नागरिकांतून समाधान

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

जांबोटी-कणकुंबी या मुख्य रस्त्यापासून हब्बनहट्टी गावापर्यंतच्या दोन ते अडीच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महाशिवरात्री यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात आल्याने हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, बैलूर, तोराळी व गोल्याळी आदी गावांतील नागरिकांबरोबरच भाविक भक्तांमध्ये समाधान पसरले आहे. गेल्या दोन वर्षापासून या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. ठिकठिकाणी रस्ता उखडून गेला होता तर काही ठिकाणी मोठमोठे ख•s पडले होते. यावर्षीच्या महाशिवरात्री यात्रेपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी हब्बनहट्टी-बैलूर परिसरातील  नागरिकांबरोबरच भाविक-भक्तांची मागणी होती. त्यानुसार श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान कमिटीने रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात देवस्थानच्या बैठकीमध्ये ठरावपास केला. त्यानंतर खानापूर व बेळगावच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महाशिवरात्रीपूर्वी हाती घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती..

Advertisement

रस्ता केल्याने समस्या दूर

या संदर्भात तरूण भारतने देखील रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात आवाज उठविला होता. त्यानुसार कंत्राटदाराने चार दिवसांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून भाविक भक्तांची खराब रस्त्यामुळे होणारी अडचण दूर केल्याने भाविक भक्तांमधून समाधान पसरलेले आहे.

निवेदनाची घेतली दखल

काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला हा रस्ता गेल्या वर्षभरापासून इतका खराब झाला होता की, चारचाकी तरी अवघडच, पण दुचाकी सुद्धा चालवणे मुश्कील झालं होतं. यासंदर्भात देवस्थान कमिटीने आमदार, तहसीलदार, बेळगावचे वरिष्ठ अधिकारी संबंधित कंत्राटदाराला निवेदन देऊन यात्रेपूर्वी रस्त्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली. दि. 8 आणि दि. 9 मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविक-भक्तांची रस्त्यामुळे गैरसोय झाली असती, परंतु अखेर कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केल्याने देवस्थान कमिटी तसेच हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी व बैलूर आदी गावातील नागरिकांमधून समाधान पसरले आहे.

Advertisement
Tags :

.