मळेवाड जकात नाका येथील धोकादायक रस्त्याचे डांबरीकरण
रस्त्यावरील खडी,डांबर उखडल्यामुळे रस्ता बनला होता धोकादायक
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड जकात नाका येथील कोंडुरेकडे जाणारा रस्ता तसेच मळेवाड पुलानजीक रस्त्याची पहिल्याच पावसात दयनीय अवस्था झाली होती,या रस्त्यावर मागील महिन्यातच खडीकरण डांबरीकरण झाले होते.मात्र पावसाने उसंत घेताच या रस्त्यावरी खडीकरण, डांबरीकरण अक्षरशः उखडून येथील खडी रस्त्यावर पसरली होती .त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना,पादचाऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील डांबर वितळून ते गाडीच्या चाकांना लागून अधिकच खडी उखडून रस्ता खड्डेमय झाला होता.अचानक ब्रेक लावल्याने वाहनचालकांची तारांबळ उडून अपघात होत होते.रस्त्यावरून चालताना सुद्धा वितळलेल्या डांबरामुळे चालणे कठीण झाले होते.त्यामुळे हा रस्ता धोकादायक ठरला होता. हा रस्ता दुरूस्त होण्याची मागणी होत होती.त्यामुळे स्त्यावर पडलेले खड्डे, उखडलेली खडी,डांबर याचे काम परत करण्यात आले.त्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.मात्र या रस्त्याचे काम केल्यावर लागलीच पावसाने हजेरी लावल्याने हा रस्ता उखडल्याचे कामगारांनी सांगितले .