For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृंदावन कॉलनीमधील ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण करा

10:21 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वृंदावन कॉलनीमधील ‘त्या’ रस्त्याचे डांबरीकरण करा
Advertisement

बेळगाव : महांतेशनगर येथील वृंदावन कॉलनीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करून पुन्हा ‘त्या’ रस्त्याची खोदाई करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. यामुळे रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वृंदावन कॉलनीमध्ये यापूर्वी रस्ता करण्यात आला. त्यानंतर पाईप घालण्यासाठी पुन्हा रस्ता खोदाई करण्यात आला. रस्ता खोदाई केल्यानंतर त्या चरी योग्य प्रकारे बुजविल्या नाहीत. त्यामुळे पाऊस पडला तर त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे ये-जा करताना नागरिकांना तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.