For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अस्मिता, मालविकाचे आव्हान समाप्त

06:27 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
अस्मिता  मालविकाचे आव्हान समाप्त
Advertisement

वृत्तसंस्था/ योकोहमा

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या जपान खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अस्मिता चलिहा आणि मालविका बनसोड यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात चीन तैपेईच्या तेई यांगने अस्मिताचा 21-16, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. तर दुसऱ्या एका सामन्यात युक्रेनच्या पोलिना बुरोहाने मालाविकाचा 23-21, 21-19 असा पराभव केला. भारताच्या आकर्षि कास्यपलाही पहिल्याच फेरीत कोरियाच्या इयुनने 13-21, 12-21 असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या रेहान कुशारजेंतो आणि लिसा कुसुमावती यांनी भारताच्या सतीशकुमार, करुणाकरण व आद्या वेरियात यांचा 21-10, 21-18 असा पराभव केला

Advertisement

Advertisement
Tags :

.