अस्मिता लीग अॅथलेटिक्स स्पर्धा उत्साहात
बेळगाव : बेळगाव अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा अॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने अस्मिता लीग अॅथलेटिक्स स्पर्धा लेले मैदान टिळकवाडी येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगाव जिल्यातील 100 हुन अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा 14 आणि 16 वर्षांखालील मुलींसाठी आयोजित केल्या होत्या. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक आनंद चव्हाण, संभाजी देसाई, नागेंद्र काटकर, अशोक शिंत्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत विजेते खेळाडू खालीलप्रमाणे-
ट्रायथ्लॉन अ- सेजल धामणेकर, श्रीपदा घाडी, रिंधी झानगराचे, ट्रायथ्लॉन ब-ऋतूजा जाधव, सिद्धि बुद्रुक, सायली पाटील. ट्रायथ्लॉन क- समिक्षा कर्तस्कर, स्वरांजली बांडगी, यल्लव्वा बानसे, भालाफेक-सेजल धामणेकर, श्रावणी पाटील, सायली पाटील, 16 वर्षाखालील - 600 मी. धावणे- गौरी पुजारी, सृष्ठी जुवेकर, सर्वज्ञा अंबोजी, गोळाफेक-श्वेता हंजूर, सेजल गुंजीकर, केतकी मुतगेकर, थाळीफेक- श्वेता हंजूर, ऋतुजा साळवी, ममता फगरे, 60 मी. धावणे- श्रावणी जाधव, श्रृती निलजकर, साक्षी खांदारे, लांबउडी-प्रतिज्ञा मोहिते, ऋतूजा सुतार, साक्षी नार्वेकर, उंचउडी-ऋतूजा सुतार, प्रतिज्ञा मोहिते, श्रावणी खोत, भालाफेक- ऋतूजा साळवी, ज्योती बडवणकर, श्र्रद्धा कणबरकर. या सर्व विजेत्या खेळाडूंना पाहुण्याच्या उपस्थिती सन्मानीत करण्यात आले.