For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

05:25 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मी मांजरेकर प्रथम

सावंतवाडी -

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग तर्फे पणदूर शिवाजी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या ५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आठ तालुक्यातील आठ स्पर्धक सहभागी झाले होते. तर प्राथमिक फेरीत जिल्ह्यातून ३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.अस्मिला सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका व तिची आई प्रा. सुषमा मांजरेकर तसेच प्रशालेच्या शिक्षिका सौ. प्रीती सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. बदलत्या हवामानाचा पर्यावरणावर झालेले परिणाम या विषयावर ७ मिनिटे तिने भाषण केले. यापूर्वीही अस्मीने अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत. पारितोषिक वितरण आमदार वैभव नाईक, वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी आवटी, शिक्षण संस्था सचिव नागेश मोरये, पणदूर हायस्कूल चे मुख्यद्यापक मालवणकर,विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर आदी उपस्थित होते.तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही बी नाईक, स्कूल कमिटी चेअरमन डॉ दिनेश नागवेकर, सर्व पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक दिनेश धोंड, उपमुख्यद्यापक पी . एम सावंत, पर्यवेक्षक भाग्यश्री चौकेकर, वर्गशिक्षिका शुभांगी देसाई सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.