महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुणेरी पलटनच्या विजयात अस्लम, गौरवची चमक

06:01 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

2024 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार अस्लम इनामदार आणि गौरव खत्री यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटनने यु मुंबाचा 35-28 अशा 7 गुणांच्या फरकाने पराभव केला.

Advertisement

महाराष्ट्रातील या दोन अव्वल संघांमधील हा सामना चुरशीचा झाला. हैदराबादच्या गच्चीबोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याला कबड्डी शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणेरी पलटनचा कर्णधार अस्लम इनामदार हा या सामन्यातील प्रामुख्याने विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 10 गुण मिळविले. त्यापैकी चढाईमध्ये 9 गुण घेतले. गौरव खत्रीने 7 गुण तर मोहित गोयतने 9 गुण घेतले. यु मुंबातर्फे अजित चव्हाणने आपल्या चढायांवर 9 गुण मिळविले. सामना सुरु झाल्यानंतर पुणेरी पलटनचा कर्णधार अस्लम इनामदारने आपल्या चढायावर यु मुंबाचे खेळाडू बाद करत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. तर यु मुंबा संघाचा कर्णधार आणि बचाव फळीत खेळणारा सुनील कुमार याने चोख प्रत्युत्तर अस्लमला दिले. यु मुंबाचे केवळ 3 खेळाडू मैदानात असताना सुनील कुमारने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर पुणेरी पलटनच्या पंकज मोहितेची अप्रतिम पकड केली. पुणेरी पलटनने यु मुंबाचे सर्व गडी पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर गोयतने सलग गुण वसुल केले. मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने यु मुंबावर 22-16 अशी 6 गुणांची आघाडी मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर गौरव खत्रीने 5 गुण आपल्या संघाला मिळवून दिले. त्यानंतर पुणेरी पलटनने आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखत हा सामना 7 गुणांच्या फरकाने जिंकला. यु मुंबा संघावर शेवटच्या 10 मिनिटात चांगलेच दडपण आल्याने त्यांना शेवटी पराभवाला सामोरे जावे लागले. विद्यमान विजेत्या पुणेरी पलटनचा यु मुंबावरील हा चौथा विजय आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article