For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ashta crime news | शेडचे साहित्य काढल्याचा जाब विचारणे पडले महागात; मेंढपाळाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण

07:00 PM May 04, 2026 IST | NEETA POTDAR
ashta crime news   शेडचे साहित्य काढल्याचा जाब विचारणे पडले महागात  मेंढपाळाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारहाण
Advertisement

                       आष्ट्यात मेंढपाळावर जीवघेणा हल्ला

Advertisement

आष्टा - गोटखिंडी ते महकंबेरस्त्यावरील एका मॅढवाडयाच्या शेडचे साहित्य काढल्याच्या कारणावरून विचारणा करण्यास गेलेल्या मेंढपाळावर आणि त्यांच्या सहकाऱ्यावर लोखंडी रॉड, फरशी आणि कळकाच्या काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना दिनांक १ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी प्रमोद बाळासो कोळेकर (रा. गोटखिंडी) यांनी आष्टा पोलीसात फिर्याद दिली.

फिर्यादी प्रमोद कोळेकर यांचा गोटखिंडी-महकंबे रोडवर मेंढवाडा आहे. या मेंढवाड्याच्या शेळ्यांच्या शेडची जाळी आणि पत्रे गावातीलच आदित्य मदने, अर्जुन मदने आणि सिद्धेश्वर जाधव यांनी काढून टाकले होते. याचा जाब विचारण्यासाठी प्रमोद कोळेकर आणि सचिन शहाजी कोळेकर हे संबंधित ठिकाणी गेले होते. त्यावेळी तू आमच्या रस्त्यावरका आलास? असे म्हणत तिचे उपस्थित संशयितांनी फिर्यादींना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पिंटू मदने याने प्रमोद कोळेकर यांच्या तोंडावर आणि उजव्या डोळ्याजवळ फरशीने प्रहार केला, तर रोहित मदने याने लोखंडी रॉडने त्यांच्या पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली.

Advertisement

फिर्यादीसोबत असलेल्या सचिन कोळेकर यांना सिद्धेश्वर जाधव आणि दोन अनोळखी व्यक्तींनी कळकाच्या काठीने मारहाण करून जखमी केले. तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत आरोपींनी पळ काढला. या हल्ल्यात प्रमोद कोळेकर आणि सचिन कोळेकर हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आदित्य अरुण मदने, रोहित पोपट मदने, पिंटू, गणपती मदने, सिद्धेश्वर बबन जाधव, अर्जुन संजय मदने (यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती, राहणार गोटखिंडी) यांच्यावर गुन्डा नोंद केला.

Advertisement
Tags :

.