For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारीशक्ती विधेयकाबाबत काँग्रेस उमेदवारांना विचारा!

01:11 PM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
नारीशक्ती विधेयकाबाबत काँग्रेस उमेदवारांना विचारा
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन: भाजपचा पणजीत काँग्रेसच्या निषेधार्थ मोर्चा

Advertisement

पणजी : नारीशक्तीच्या विकासाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये जनतेने योग्य तो धडा शिकवावा, काँग्रेस उमेदवार मते मागण्यासाठी दारावर आला की त्याला नारीशक्तीच्या विकासाला विरोध का केला? असा प्रश्न विचारावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. काँग्रेस व इतर विरोधी पक्षांच्या भूमीकेमुळेच हे महत्त्वाचे विधेयक संमत होऊ शकले नाही, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या भूमिकेविरोधात महिला भाजपतर्फे  पणजी येथे जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, आमदार देविया राणे, डिलायला लोबो, व इतर भाजपच्या शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. महिलांच्या हक्कांसाठी आणि राजकीय सक्षमीकरणासाठी महिला आरक्षण अत्यावश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. मोर्चा दरम्यान ‘नारी शक्तीचा विजय असो’ वन्दे मातरम् अशा प्रकारची घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा दर्शवला.  विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला. आगामी काळात महिला आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडला जाईल, असा इशाराही देण्यात आला. मोर्चा भाजप मुख्यालयापासून सुऊ झाला तो काँग्रेस भवनपर्यंत काढण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.