For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लंकन संघात चमिराच्या जागी असिता फर्नांडो

06:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
लंकन संघात चमिराच्या जागी असिता फर्नांडो
Advertisement

वृत्तसंस्था /कोलंबो

Advertisement

भारतीय क्रिकेट संघ सध्या लंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळविल्या जाणार आहेत. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा करण्यात आली. या संघात दुखापतग्रस्त डी. चमिराच्या जागी वेगवान गोलंदाज असिता फर्नांडोचा समावेश करण्यात आला आहे. चमिराला गेल्या काही दिवसांपासून श्वसनक्रियेची समस्या जाणवत आहे. मध्यंतरी त्याला कफाचाही त्रास अधिक झाला होता. ब्रॉकायटस हे त्याच्या आजाराचे निदान झाल्याने तो या आगामी मालिकेसाठी उपलब्ध होवू शकणार नाही, असे क्रिकेट लंकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

लंकन निवड समिती प्रमुख उपुल थरंगाने गुरूवारी या मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा केली. चमिरा टी-20 आणि वनडे मालिकेसाठीही उपलब्ध होऊ शकणार नाही. 27 जुलैपासून भारताच्या लंकन दौऱ्याला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर उभय संघात 3 वनडे सामने, 2, 4, 7 ऑगस्ट रोजी खेळविले जातील. टी-20 चे सर्व सामने पल्लीकेले स्टेडियममध्ये तर वनडे सामने प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळविले जातील. यावेळी दोन्ही संघांचे नवे प्रशिक्षक राहतील. गौतम गंभीर भारतीय संघाचे तर माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्या लंकन संघाचे प्रशिक्षक राहतील.

Advertisement

लंकन संघ : चरिथ असालेंका (कर्णधार), निशांका, कुशल परेरा, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडीस, दिनेश चंडीमल, कमिंदू मेंडीस, दासुन शनाका, हसरंगा, वेलालगे, महेश तिक्ष्णा, सी विक्रमसिंगे, पथीरणा, तुषारा, असिता फर्नांडो आणि बिनुरा फर्नांडो

Advertisement
Tags :

.