आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ दुबई
येथे बुधवारपासून 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने 60 जणांचा संघ निवडला आहे.
भारताचे अॅथलिट्स सिद्धार्थ चौधरी आणि महिला धावपटू लक्षिता सँडिलीया हे अनुक्रमे पुरूषांच्या गोळाफेक आणि महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करतील. 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान पेरूतील लिमा येथे होणाऱ्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीची ही पात्र फेरीची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 2023 साली कोरीयात झालेल्या आशियाई युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 6 सुवर्णांसह एकूण 19 पदकांची कमाई केली होती. त्याचप्रमाणे भारताने 7 रौप्य आणि 6 कांस्यपदके मिळवित पदक तक्त्यात तिसरे स्थान पटकाविले होते. 2023 च्या स्पर्धेमध्ये जपान पहिल्या तर चीन दुसऱ्या स्थानावर होता. बुधवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय पथक अधिक पदकांची कमाई करेल, अशी आशा प्रमुख प्रशिक्षक एन. रमेश यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या 4×100 मी. रिले प्रकारात कांस्यपदक तर 4×400 मी. रिले प्रकारात भारताने रौप्यपदक मिळविले होते. यावेळी या दोन्ही रिले प्रकारात भारताला सुवर्णपदके मिळविण्याची संधी आहे.
भारतीय संघ - पुरूष : अभिराम प्रमोद, अमन चौधरी, अनुरागसिंग कलेर, बापी हंसदा, देवकुमार मिना, दिपांशु शर्मा, मृत्यम जयराम दोंडापती, गौरव भोसले, हर्षितकुमार, हिमांषु, हिमा तेजा विलापी, कार्तिकेयन सुंदरराजन, कुलदीपकुमार, महेंद्र एस., मोहम्मद साजिद, नवप्रीतसिंग, निखिल ढाके, प्रतिक, प्रियांशु, एस. राहुल, रणवीर अजय सिंग, रितीक, रोहन घोष, रोहन यादव, सचिन, साहिल मलिक, शहनवाज खान, शाहरुख खान, सिद्धार्थ चौधरी, विकासकुमार बिंद आणि विनोदसिंग.
महिला : आरती, अभिनया राजारंजन, अमनात कंबोज, अनुष्का यादव, अनुष्का कुंभार, साईसंगीता दोडला, एकता डे, जयाविंदीया जगदीश, कनिष्टाटिना शेखर, लक्षीता सँडिली, एम. काजला, नंदिनी, निओली अण्णा, निकिता कुमारी, पवना नागराज, प्राची देवकर, प्रतिक्षा अशोककुमार, ऋषिका अवस्थि, रुजुला भोसले, सविता टोपो, साक्षी चव्हाण, सँड्रेमोल साबू, शिल्पाबेन डिव्होरा, श्रेया राजेश, सिया सावंत, सुनिता देवी, तन्वी मलिक आणि उन्नती बोलँड.