आशियाई पेंचक सिलात स्पर्धा गोव्यात
06:32 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, मडगाव
Advertisement
अखिल भारतीय पेंचक सिलात फेडरेशनतर्फे 19 ते 23 एप्रिल 2027 साली चौथी कनिष्ठांची तसेच अकरावी वरिष्ठांची आशियाई पेंचक सिलात चॅम्पियनशिप स्पर्धा गोव्यातील मनोहर परिकर स्टेडियममध्ये भरविली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये विविध देशांचे कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील स्पर्धक सहभागी होत आहेत. अखिल भारतीय पेंचक सिलात फेडरेशनला सदर स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. पेंचक हा क्रीडा प्रकार कराटे (मार्शल आर्ट) अंतर्गत असून कॉम्बॅट आणि आर्टिस्टिक अशा सुंदर मिश्रणाचा हा क्रीडा प्रकार आहे.
Advertisement
Advertisement