For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एशियन पेंटसचा नफा घटला, महसूल वाढला

06:21 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
एशियन पेंटसचा नफा घटला  महसूल वाढला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रंग उत्पादक कंपनी एशियन पेंटसने आपल्या आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यात घसरण झाली असून महसुलात मात्र वाढ नेंदली गेली आहे.

स्पर्धेच्या कारणास्तव कंपनीच्या नफ्यावर परिणाम दिसल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 4 टक्के घसरणीसोबत 1060 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी कंपनीने 1110  कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. दुसरीकडे 3 टक्के वाढीसोबत कंपनीने सदरच्या तिमाहीत 8867 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी 8549 कोटी रुपये इतका होता. नफा कमी होण्यामागे मागच्या तिमाहीत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांची चांगली टक्कर सांगितली जात आहे. नव्या कर्मचारी संहितेच्या कार्यवाहीसाठी कंपनीने 64 कोटी रुपये खर्च केले असल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Tags :

.