एशियन पेन्ट्सचा नफा 1,110 कोटींवर
आर्थिक वर्ष 2024-25 मधील कामगिरीची आकडेवारी
नवी दिल्ली :
एशियन पेन्ट्स लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तिसऱ्या तिमाहीत जवळपास 1,110 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमविला आहे. वर्षाच्या आधारे हा आकडा काहीसा कमीच राहिला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,448 कोटी रुपयाची नफा कमाई केली आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा विक्री महसूल हा 6 टक्क्यांनी कमी होत 8,549 कोटी रुपयांवर राहिला आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा 9,103 कोटी रुपयावर राहिल्याची नोंद आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या तुलनेत कंपनीचा नफा हा 60 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 695 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या कालावधीत महसूलातही 6 टक्क्यांची वाढ राहिली होती.
वर्षात समभाग 24 टक्क्यांनी घसरला
एशियन पेन्ट्सचे समभाग 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 2,350 वर व्यवहार करत आहेत. मागील पाच दिवसांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग 5.55 टक्क्यांनी आणि एका महिन्यात 3.65 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 2.25 लाख कोटी रुपयावर राहिले आहे.
60 हून अधिक देशांमध्ये कंपनीचा विस्तार
एशियन पेन्ट्सची सुरुवात ही 1942 मध्ये झाली. आहे. सध्या कंपनी 15 देशांमध्ये कार्यरत आहे. तर जगभरात त्यांच्या 27 पेंट उत्पादन सुविधा आणि 60 हून अधिक देशांमध्ये ग्राहक सेवा देण्याची केंद्रे आहेत.