For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आशियाई बाजाराचा सेन्सेक्स-निफ्टीवर परिणाम

06:58 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशियाई बाजाराचा सेन्सेक्स निफ्टीवर परिणाम

सेन्सेक्सची तब्बल 736 अंकांवर घसरण : टीसीएस, इन्फोसिससह रिलायन्सचे समभाग नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियाई बाजारामध्ये नकारात्मक कल राहिला होता. याचा परिणाम हा भारतीय भांडवली बाजारात मंगळवारच्या सत्रात नकारात्मक झाल्याचे दिसून आले. मुख्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. यामुळे सेन्सेक्स तब्बल 700 पेक्षा अधिक तर निफ्टी निर्देशांक 238 अंकांनी घसरणीत राहिला होता.

Advertisement

भारतीय बाजाराची सुरुवात ही घसरणीसोबत झाली होते. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 736.37 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 72,012.05 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 238.25 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 21,817.45 वर बंद झाला आहे.

Advertisement

अभ्यासकांच्या मते अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरासह अन्य काही निर्णय या आठवड्यात घेणार आहे. त्याच्या अगोदरच गुंतवणूकदारांनी आपली भूमिका सावधपणे घेण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच निर्देशांकामध्ये आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले. यामुळे याचा नकारात्मक परिणाम हा भारतीय बाजारावर राहिल्याचेही अभ्यासकांनी स्पष्ट केले.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये मंगळवारच्या सत्रात टीसीएसचे समभाग हे 4 टक्क्यांपेक्षा अधिकने घसरणीत राहिले आहेत. दरम्यान इंडसइंड बँक, विप्रो, नेस्ले, एचसीएल टेक, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, टेक महिंद्रा, टाटा मोर्ट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.

अन्य कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, टायटन आणि भारती एअरटेल

Advertisement
Tags :
×

.