For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एशियाड विजेता भारत आज विंडीजशी भिडणार

06:58 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
एशियाड विजेता भारत आज विंडीजशी भिडणार
Advertisement

संजू सॅमसनला खेळवायचे की वैभव सूर्यवंशीला हा प्रशिक्षक गंभीरसमोर पेच, दोघेही संघात झळकण्याची शक्यता कमीच

Advertisement

वृत्तसंस्था, लखनौ : आशियाई क्रीडा स्पर्धेतील शानदार कामगिरीनंतर आत्मविश्वासपूर्ण भारतीय संघ आज मंगळवारी येथे वेस्ट इंडीजाविऊद्ध पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय लढत खेळणार आहे. या सामन्यात डावाची सुऊवात करण्यासाठी संजू सॅमसनला पसंती द्यायची की, किशोरवयीन वैभव सूर्यवंशीला संधी द्यायची, हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोरील सर्वांत मोठा पेच असेल.

व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्याकडून गंभीर यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर जरी दोन्ही प्रशिक्षकांचा आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची खोली राखण्यावर विश्वास असला, तरी रणनीतीमध्ये नक्कीच बदल दिसून येईल,  मात्र गंभीर यांची कार्यपद्धती पाहता अभिषेक शर्माची निवड निश्चित असल्याने ते एकाच संघात सॅमसन आणि सूर्यवंशी या दोघांनाही खेळवण्याची शक्यता कमी आहे. निशिन शहरातील कोरोजी स्पोर्ट्स पार्कमधील खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन लक्ष्मण यांनी तिघांनाही खेळवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लखनौच्या एकाना स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल असण्याची शक्यता असल्याने अष्टपैलू नितीशकुमार रे•ाr खालच्या क्रमांकावर उपलब्ध असल्याचा आधार घेत गंभीर पुन्हा एकदा सॅमसनला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याचा विचार करू शकतात.

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना सॅमसन फारसा सहज वाटला नव्हता, परंतु उपखंडातील परिस्थितीचा विचार करता अफगाणिस्तानविऊद्धच्या मायदेशातील मागील टी-20 मालिकेत त्याने दोन अर्धशतके झळकावली होती. मधल्या फळीत इशान किशन, कर्णधार तिलक वर्मा, आक्रमक फलंदाज शिवम दुबे आणि रे•ाr यांच्यासोबत अक्षर पटेल आधीच असल्याने सूर्यवंशी आणि सॅमसन हे दोघेही एकाच संघाचे भाग असण्याची शक्यता कमी आहे.

प्रशिक्षक गंभीर यांच्यासमोरील आणखी एक आव्हान म्हणजे वेगवान गोलंदाजीचा विभाग आहे, ज्यामध्ये अनुभवी अर्शदीप सिंगसोबत दिल्लीचे तुलनेने अननुभवी खेळाडू मयंक यादव (6 टी-20 सामने) आणि प्रिन्स यादव (3 टी-20 सामने) यांचा समावेश आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. जर गंभीरना फलंदाजी अधिक मजबूत करायची असेल, तर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात आलेल्या नमन धीरला प्रिन्स किंवा मयंक यांच्यापैकी एकाच्या जागी खेळवले जाऊ शकते. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत काही बळी घेत आपली गोलंदाजीची क्षमता सिद्ध करणाऱ्या अभिषेकचा फिरकी गोलंदाज म्हणून अय्यर वापर करतो का हे पाहणे रंजक ठरेल.

अय्यरच्या नेतृत्वाची ही एक मोठी कसोटी असेल, कारण वेस्ट इंडिज हा या प्रकारातील एक बलाढ्या संघ मानला जातो. असे असले, तरी भारताचे पारडे जड असेल. कारण मायदेशात खेळल्या गेलेल्या गेल्या 10 सामन्यांपैकी नऊ सामन्यांत भारताने कॅरिबियन संघाचा पराभव केला आहे. वेस्ट इंडिजकडे रोमॅरियो शेफर्ड, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर आणि अकील होसेन यासारखे विविध लीगमध्ये खेळणारे अनेक खेळाडू आहेत. कर्णधार शाई होपव्यतिरिक्त वेस्ट इंडिजची फलंदाजी प्रामुख्याने हेटमायर, पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड यांच्यावर अवलंबून असेल.

भारत: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, इशान किशन, नमन धीर, कुलदीप यादव, नितीशकुमार रे•ाr, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, मयंक यादव.

वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्य्रू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, अकील होसेन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, कामिल पूरन, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, रोमॅरियो शेफर्ड, शामर स्प्रिंगर.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार

Advertisement
Tags :

.